भुसावळ नगरपरिषदेत नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीने राजकीय हालचालींना वेग


भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ नगरपरिषदेत नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक राजकारणात महत्त्वपूर्ण हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत (नामनिर्देशन सदस्यांची अर्हता व नियुक्तीची पद्धत) नियम, २०१० अंतर्गत एकूण पाच नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे नगरपरिषदेत सत्तासमीकरण अधिक ठळक झाले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अपक्ष गट) व भुसावळ येथील एका अपक्ष गटाकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून माजी आमदार संतोष चौधरी, ज्यांना ‘दाडी’ या नावाने ओळखले जाते, यांची निवड झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) व अपक्ष गटाकडून माजी आमदार संतोष चौधरी यांचीच नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी आमदार संतोष चौधरी यांची नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून झालेली एन्ट्री ही विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. दीर्घ राजकीय अनुभव असलेल्या चौधरी यांच्या उपस्थितीमुळे नगरपरिषदेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जरी नामनिर्देशित सदस्यांना नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मतदानाचा अधिकार नसला, तरी विविध समित्यांमध्ये सहभाग, विकासकामांबाबत सूचना तसेच धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या नियुक्त्या केवळ औपचारिक नसून, भुसावळच्या विकासराजकारणावर त्याचा परिणाम होणार असल्याचे संकेत आहेत.
भुसावळ नगरपरिषदेत एकूण ५२ सदस्य असून त्यामध्ये एक नगराध्यक्ष व ५० नगरसेवकांचा समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर पक्षनिहाय सदस्यसंख्येचा विचार करून नामनिर्देशित सदस्यांची वाटणी करण्यात आली. जिल्हा निवडणूक कार्यालयाने विविध पक्षांकडून प्राप्त प्रस्तावांची छाननी करून या नियुक्तींना अंतिम मंजुरी दिली आहे. याआधी उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक यशस्वीपणे पार पडली होती.
             या नियुक्त्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक म्हणजे तीन नामनिर्देशित सदस्य मिळाले आहेत. भाजपकडून डॉ. प्रसाद वासुदेव बोंडे, नितीन बाबुराव धांडे आणि संजयकुमार सुशीलकुमार नहाटा यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषद निवडणुकीत भाजपने २७ जागा जिंकत आधीच बहुमत सिद्ध केले होते. आता नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीमुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे.

महाराष्ट्रात 66 जण बनले बिनविरोध नगरसेवक