📰 बातमी
घरफोडीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीस चोप
भुसावळ (प्रतिनिधी):भुसावळ शहरातील चिकुच्या मळा, रूपमिलन नगर परिसरात घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयित आरोपीस स्थानिक नागरिकांनी पकडून चोप दिल्याची घटना घडली. ही घटना रात्रौ धार्मिक कार्यक्रम सुरू असताना घडली.
