श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त बबलू सुरेश बऱ्हाटे यांच्या पुढाकारातून भुसावळात भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

भुसावळ | प्रतिनिधी

श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांसाठी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर नगरसेवक व गटनेते बबलू सुरेश बऱ्हाटे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येत आहे.

हे शिबिर रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता भुसावळ शहरातील राम मंदिर वार्ड, चिरा गल्ली, राठी सरांच्या घराजवळ आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, तसेच मोतीबिंदू निदान झालेल्या रुग्णांसाठी पुढील उपचार व शस्त्रक्रियेची सोय करण्यात येणार आहे. शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आधार कार्ड व रेशन कार्डची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

प्रभाग क्रमांक ११ मधील सर्व नागरिकांनी या आरोग्यविषयक उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक बबलू सुरेश बऱ्हाटे यांनी केले आहे.

महाराष्ट्रात 66 जण बनले बिनविरोध नगरसेवक