मुंबई | स्थानिक राजकारण
महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांमध्ये झालेल्या नगरसेवक निवडणूक प्रक्रियेत एकूण 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. या बिनविरोध निवडींमध्ये भाजपाने सर्वाधिक 43 जागांवर विजय मिळवला, तर शिवसेना 19 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पक्षनिहाय बिनविरोध नगरसेवक संख्या
भाजप – 43
शिवसेना – 19
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 2
इस्लामिक पक्ष – 1
अपक्ष – 1
महानगरपालिका निहाय बिनविरोध निवड
पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे भाजपाचे प्रत्येकी 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. पनवेलमध्ये भाजपाचे 6 तर 1 अपक्ष नगरसेवक बिनविरोध ठरला. ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचे 7 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले. मिरा-भाईंदरमध्ये भाजपाचे 6 नगरसेवक बिनविरोध निवडले गेले.
कल्याण-डोंबिवली येथे भाजपाचे 14 तर शिवसेनेचे 6 नगरसेवक बिनविरोध ठरले. धुळे मध्ये भाजपाचे 4 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. मालेगावमध्ये इस्लामिक पक्षाचा 1 नगरसेवक बिनविरोध झाला.
जळगावमध्ये भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी 6 नगरसेवक बिनविरोध निवडले गेले. अहिल्यानगर मध्ये भाजपाचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे 2 नगरसेवक बिनविरोध विजयी ठरले. स्थानिक राजकारणावर परिणाम मोठ्या प्रमाणावर झालेल्या बिनविरोध निवडींमुळे अनेक महानगरपालिकांमध्ये निवडणूक लढती कमी झाल्या असून, आगामी महापालिका राजकारणातील पक्षांची ताकद स्पष्ट झाली आहे. या निकालांचा स्थानिक राजकीय समीकरणांवर महत्त्वाचा परिणाम होणार असल्याचे चित्र दिसत आहे.


