खटला जलदगती न्यायालयात चालवावा – नामदार संजय भाऊ सावकारे
भुसावळ तालुका, साक्री येथे अल्पवयीन मुलींना युवकांनी विहिरीत फेकून देत निर्दयपणे खून केल्याची घटना समोर आली असून, या अमानवी व संतापजनक प्रकाराबाबत दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच सदर खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, अशी ठाम मागणी माननीय नामदार संजय भाऊ सावकारे यांनी लेखी स्वरूपात केली आहे.
या घटनेत अल्पवयीन मुलींचा खून करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, समाजमन हादरून गेले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, मानवतेला काळीमा फासणारा असल्याचे मत नामदार सावकारे यांनी व्यक्त केले
या प्रकरणाचा तपास वेगाने, पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने करून दोषींवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून पीडित कुटुंबांना न्याय मिळेल आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कायद्याचा धाक निर्माण होईल, असेही त्यांनी प्रशासनाकडे स्पष्टपणे नमूद केले.
या संदर्भातील लेखी निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, शासनाने या प्रकरणात संवेदनशीलता व कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

