
जळगाव | प्रतिनिधी
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदू राष्ट्र-जागृती सभेच्या पार्श्वभूमीवर शनिवार, ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता जळगाव शहरात भव्य वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या वाहन फेरीत मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

ही वाहन फेरी बिग बाजार (नेहरू चौक) येथून प्रारंभ होऊन लाल बहादूर शास्त्री चौक (टॉवर चौक), चित्रा चौक, कोर्ट चौक, गणेश कॉलनी, बजरंग बोगदा, एसएमआयटी कॉलेज, सुकृती पिनाकल, गजराल पेट्रोल पंप, दादावाडी, पिंप्राळा विभाग मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पिंप्राळा चौक येथे समारोप होणार आहे.
हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने या वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले असून, शहरात भगव्या ध्वजांनी नटलेली ही फेरी विशेष आकर्षण ठरणार आहे. आयोजकांनी जळगावसह परिसरातील हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : ९५७२८४२६४३
