ब्रेकिंग न्यूज |
तापी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; भुसावळ शहरावर शोककळा

🟥 ब्रेकिंग न्यूज |
तापी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; भुसावळ शहरावर शोककळा


भुसावळ : शहरातील गंगाराम प्लॉट परिसरातील रहिवासी प्रतीक अनिल महाजन या तरुणाचा तापी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

   या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रतीक हा तापी नदी परिसरात छोटा पूल येथे पोहण्यासाठी गेला असता पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व बचाव पथकांनी शोधमोहीम राबविली. मात्र त्याला वाचविण्यात यश आले नाही.
या दुर्दैवी घटनेमुळे गंगाराम प्लॉट परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईक व मित्रपरिवाराकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

#Bhusawal #TapiRiver #BreakingNews #KhandeshLiveNews #PratikMahajan #JalgaonNews #BhusawalNews